जालिहाळ बु .
“प्रगतिशील, आत्मनिर्भर आणि विकासाभिमुख गाव”
ग्रामपंचायत सेवा
रहिवाशी दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
जन्म प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- रुग्णालयाचे प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
मृत्यू प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड
- डॉक्टरी प्रमाणपत्र
- नातेवाईकाचा पुरावा
ना हरकत दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
ग्रामपंचायत उपक्रम
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले प्रकल्प आणि भविष्यातील योजना
अंतरराष्ट्रीय योग दिन
आज जालीहाळ बुद्रुक येथे उत्साहात अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, स्थानिक शाळा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्राणायाम, आसने आणि ध्यान साधना घेण्यात आली.
योग हे केवळ व्यायाम नसून मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासाने आरोग्य सुधारते, मन शांत राहते आणि सकारात्मक विचारांची वाढ होते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
🌿 “आरोग्य हीच खरी संपत्ती” — योगाभ्यासाने आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनाची वाट 🌿
जालीहाळ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे सर्व ग्रामस्थांना
अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जालिहाळ बु . ग्रामपंचायत | मुख्यमंत्री पंचायतराज अभियान
जालिहाळ बु . ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात गावातील नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
डॉक्टर, आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत टीमच्या सक्रिय सहभागामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
✅ सर्वसाधारण आरोग्य तपासणी
✅ रक्तदाब / साखर तपासणी
✅ औषध वितरण
✅ आरोग्य जागृती
जालिहाळ बु . — आरोग्यदायी व सशक्त गावाकडे वाटचाल!
सर्व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏✨
“गाव आपलं, जबाबदारीही आपली. स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि लोकसहभाग हाच खरी विकासाची चावी.”
चला, आपण सर्व मिळून हरित, स्वच्छ, प्रगत गाव घडवूया.
पदाधिकारी/अधिकारी

मा.श्री.मलकारसिद्ध महादेव पूजारी
लोकनियुक्त सरपंच ,जालिहाळ बु.

मा. श्री. अच्युत गणपती बिराजदार
उपसरपंच, जालिहाळ बु.

मा.श्री.श्रीमंत मारुती घेरडे
ग्रा. पं . अधिकारी
ग्रामपंचायतीशी संपर्क साधा
गावातील नवीन अपडेट्सबद्दल माहिती मिळवा, महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळवा किंवा सार्वजनिक सेवांमध्ये मदत मिळवा. आपली ग्रामपंचायत सर्व रहिवाशांना विश्वासार्ह माहिती आणि त्वरित सेवा देण्यासाठी येथे आहे.




